Anubandha: Dharma Sanskrutinche
व्यक्ती समाज देश याना आपली स्वतःचीच, विशिष्ट अशी ओळख हवी असते. ती स्वतःसाठी आणि जगाला दाखवण्यासाठी देखील. त्यासाठी राजकीय सत्ता, संपत्ती, ज्ञानविज्ञान, कला साहित्यातील प्रगल्भता, धर्म संस्कृतींवरील श्रध्दा यांचा आधार घेतला जातो. ज्या विषयात एखाद्याने प्राविण्य मिळवलेले असते तो विषय त्याचे साधन बनते. स्वतःचे वैशिष्ट्य सिध्द्ध करण्यासाठी पण जेव्हा अभिजात, प्रगल्भ आणि नवनिर्मितीप्रवण अशा मानसिकतेला नकारच दिला जातो, तेव्हा समोरच्या प्रगल्भ नवनिर्मितिप्रवण, अभिजाततेचेच भय वाटते.
आपल्यापेक्षा वेगळे असे हे लोक आपल्यावर अन्याय करताहेत, आपले शोषण करीत आहेत ही त्यांची भावना बनते. तेव्हा मग ते स्वतःच्या धर्म संस्कृतीचा, त्यांच्या विरोधात साधन म्हणून वापर करू लागतात. त्यातूनच मग या सगळ्यापासून स्वतःला दूर ठेवणारा समाज अतिरेकी बनतो.
ही गोष्ट ज्यू, ख्रिस्ती समाजातच नाही, तर काही प्रमाणात हिंदू, बौद्ध समाजातही घडत असते.
जेव्हा मानवतावादी, समानतावादी, प्रगल्भ विचार करणारे, नवनिर्मितीवर विश्वास ठेवणारे, विचारवंत, कलावंत, तत्वद्य ह्या व्यक्ती समाजाच्या सददविवेकबुदधीला जागृत करतात. तेव्हा त्या अतिरेकी वृत्तीवर ताबा ठेवला जातो. हे चढउतार होतच असतात. ते सगळे समजून घेऊन त्यांना समर्थपणे तोंड देण्याची तयारी सतत करीत राहणे, हाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे.
₹ 375.00
Book Details
ISBN | 978-93-85509-01-8 |
---|---|
Pages | 352 |
Format | Paperback |
Size | 6.0 in x 9.0 in |