एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी कुटुंबासमवेत अमेरिकेला स्थलांतर करते, किशोर वयातच ती ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी, या विचाराने झपाटली जाते। त्या साठी ऐन विशीतच आपल्या पतीसमवेत ती अमेरिका सोडते। किबुत्झमध्ये राहून कुक्कुट पालनाचे धडे घेते, प्रसंगी बालवाडीतील मुलांचे कपडे धुऊन घरखर्च भागवते। राष्ट्र उभारणीच्या ध्येयाने प्रेरित होऊन, राजकारणात प्रवेश करते। अल्पावधीतच ती आपल्या कणखर वृत्तीनं फटकळ स्पष्टवक्तेपणानं, साध्या राहणीनं आणि सहज वणीनं आपला स्वतंत्र ठसा उमटवते, इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहिरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री। वयाची सत्तरी उलटल्यावर ती पंतप्रधान होते। आंतराष्ट्रीय पातळीवर धाडसी निर्णय घेऊन ते तडीस नेते। प्रखरपणे आपली ध्येयनिष्ठा राखते। स्वतःला स्त्रीवादी न म्हणवणारी मात्र स्रीवाद्यांसाठी रोल मॉडेल ठरलेली ही ‘गोल्डा’ – अर्थात ‘गोल्डा मेयर’
वीणा गवाणकर या मराठीतील नावाजलेल्या लेखिका आहेत। त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांचा लेखनाचा मुख्य विषय असामान्य व्यक्तींचे चरित्रलेखन हा आहे।
The only biography in Marathi of Golda Meir, Prime Minister of Israel from 1969 to 1974, by well-known author Veena Gavankar.








Reviews
There are no reviews yet.