{"product_id":"pruthvichi-abhushane","title":"Pruthvichi Abhushane","description":"\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003e\u003cspan\u003eपृथ्वीवरील जीवसृष्टी हीच तिची आभूषणे आहेत. माणूस हा निसर्गाचा भाग असला तरी त्याचे निसर्गाशी द्वंद्व सुरू असल्याचे आढळते. ज्या पद्धतीने माणूस निसर्गाशी वागत आहे, त्यावरून त्याने पर्यावरणाशी एकतर्फी युद्ध पुकारल्यासारखे दिसते. त्यात माणसाचाच विनाश अटळ आहे. कारण मानवापूर्वी सृष्टी होती आणि नंतरही राहणार आहे. झाडं, पर्वत, निसर्ग, पर्यावरण, नद्या, खनिजसंपत्ती, प्राणी, माती, पाणी या सगळ्यांची मिळून वसुंधरा बनलेली आहे. ते तिचे दागिनेच आहेत. त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. मानवी वर्तनामुळेही पृथ्वीच्या आभूषणांवर गंडांतर येत आहे. त्यांची लक्तरे निघत आहेत. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हीच स्थिती आहे. झाडावर चढणारे मासे, नद्यांचा खळखळाट, पक्ष्यांचे कूजन आणि त्यांची भाषा, पावसाचे वय अशा निसर्गातील नवलाईने एकीकडे थक्क व्हायला होतं, दुसरीकडं हे सगळं ओरबाडून आपणच या भूमीचे जेते आहोत, अशा थाटात माणूस वागत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong style=\"font-size: 0.875rem;\"\u003ePublished by Indus Source Books\u003c\/strong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e | Language: Marathi | Format: Paperback\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"indussource","offers":[{"title":"Default Title","offer_id":70997696413949,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0793\/1058\/6109\/files\/PruthviFr.jpg?v=1785909201","url":"https:\/\/www.indussource.com\/products\/pruthvichi-abhushane","provider":"indussource","version":"1.0","type":"link"}