सहज सोपा विमा मंत्र पुस्तक काळाची गराज आहे। लोकांचे उत्पन्न वाढलेले आहे, तसाच खर्चही वाढलेला आहे। जीवनशैली बदललेली आहे। मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे। नोकरीमध्ये असुरक्षितता आलेली आहे। ह्या सगळ्यांमुळे आर्थिक नियोजन करणे आवश्यक झालेले आहे। आज वेगवेगळ्या आर्थिक साधनांमुळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत। त्याबरोबर ते समजून घेऊन, मगच त्यात गुंतवणूक करणे आवश्यक झालेले आहे। हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे। त्या संदर्भात ह्या पुस्तकात विमा योजनांसंबंधी व इतर आर्थिक नियोजनांसंबंधी सविस्तर माहिती आहे।